च-होली फाट्यावर शटर उचकटून 12 हजारांची घरफोडी

0
241

चऱ्होली,दि.२७(पीसीबी) – च-होली फाट्यावर अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून 12 हजारांची घरफोडी केली. ही घटना पुणे आळंदी रोडवरील चोविसावाडी येथे सोमवारी पहाटे घडली.

सोहेल इसाक शेख (वय 19, रा. अमिन कॉलनी, धार रोड, परभणी. सध्या पुणे फिरीस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रूपेश रमेश तापकीर (वय 28, रा. पठारे कॉलनी, दिघी) यांनी सोमवारी (दि. 26) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्यातील अंमलदार रात्रगस्तीवर होते. त्यांना चोविसावाडी येथील एका दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. यामुळे संशय आल्याने त्यांनी चोरट्यांचा आसपास शोध घेतला. दोनपैकी एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला तर दुसरा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. चोरट्यांनी शटर उचकटून 12 हजारांची चोरी केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.