चोरट्यांचा सुळसुळाट! पिंपरी-चिंचवडच्या ‘या’ भागातून दुचाकी चोरीला

0
365

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – आदिनाथ नगर लांडेवाडी येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना सहा मे रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत अमित गणेश शर्मा (वय 25, रा. आदिनाथ नगर, लांडेवाडी, भोसरी) यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 60 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / जे जी 1309) पाच मे रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी उड्डाणपुलाखालून दुचाकी चोरीला –
भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या खाली पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सात मे रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत गणेश मधुकर पडवळ (वय 36, रा तुकाईनगर, दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / ई एस 2563) सहा मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली फुगे प्रायमा समोरील पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लाॅक तोडून दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.