चीन मध्ये पुन्हा लॉकडाऊन…

0
284

शियान, 24 डिसेंबर – कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे पाहता चीनने पश्चिम शियान शहरात लॉकडाऊन लागू केले आहे. वुहानमध्ये महामारीचा उद्रेक झाल्यानंतर या शहराच्या दिशेने चीनचे हे सर्वात मोठे पाऊल आहे. दोन वर्षापूर्वी वुहानमध्ये प्रकरण समोर आल्यानंतर व्हायरसबाबत चीनची भूमिका किती कठोर आहे हे चीनच्या या हालचालीवरून दिसून येते.

शियान शहरातील 13 दशलक्ष लोकसंख्येला घरातच राहण्यास सांगितले आहे आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर जाण्यासाठी फक्त एक व्यक्ती नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहराबाहेर अत्यावश्यक नसलेल्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये 127 जणाना संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

फेब्रुवारीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक होणार असताना चीनमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत आहेत. उन्हाळ्यात कहर केल्यानंतर डेल्टाचा प्रभाव कमालीचा कमी झाला आहे. परंतु आता ओमायक्रॉन या नवीन प्रकाराने चिंता वाढवली आहे. जुन्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेल्या लसींना हा विषाणू राक्षस आव्हान देत आहे.