चिदंबरम यांच भवितव्य सरन्यायाधीशांच्या हाती

0
395

दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटकेची टांगती तलवार असलेल्या पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडूनही तूर्तास दिलासा मिळू शकला नाही.

या प्रकरणावर आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांचे भवितव्य सरन्यायाधीशांच्या हाती आहे.