कराडमध्ये कुख्यात गुंडाच्या छातीत ११ गोळ्या झाडून खून; परिसरात प्रचंड तणाव

0
1066

कराड, दि. २१ (पीसीबी) – वर्चस्व वादातून एका कुख्यात गुन्हेगाराच्या छातीत तब्बल ११ गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.२०) रात्रीच्या सुमारास कराड शहरातील बुधवार पेठेत घडली.

पवन सोळवंडे (वय २४, रा. बुधवार पेठ, कराड शहर) असे मयत सराईताचे नाव आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनचे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आपल्या घरी आराम करत असताना, अचानक मोठा गोळीबार झाला आणि त्यात पवनची हत्या केल्याचे समोर आले. घटनेनंतर बुधवार पेठ आणि मंडई परिसरात तणाव निर्माण झाला होता. बुधवार पेठ परिसरात काही ठिकाणी दगडफेकही झाली. पोलिसांनी घटनास्थळी लाठीचार्ज करून जमावास पांगवले व पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी शिवराज इंगवले, समीर मुजावर व जुनेद शेख यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.