चित्रकलेच्या परीक्षेसाठी घरातून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

0
468

देहूरोड, दि. १३ (पीसीबी) – चित्रकलेच्या परीक्षेसाठी देहूरोड येथील एका शाळेमध्ये गेलेली मुलगी बेपत्ता झाली. ही घटना गुरुवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची 15 वर्षीय मुलगी सोमवारी सकाळी देहूरोड येथील एका शाळेत चित्रकलेच्या परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून घरातून गेली. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मुलगी घरातून गेली. मात्र ती परत आलीच नाही.

फिर्यादी यांनी मुलीची सर्वत्र चौकशी केली. मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा फिर्यादीचा संशय आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.