चिखली स्पाईन रस्त्यावरील गुंजकर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपत आला, पेशंटला बेड खाली करायला सांगितले

0
691

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात ऑक्सिजन टंचाई आता रुग्णांच्या जीवावर आली आहे. चिखली स्पाईन रस्त्यावरील गुंजकर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपला, पेशंटला बेड खाली करायला सांगितले.

दरम्यान, या विषयावर हॉस्पिटलचे संचालक डॉ. नंदकुमार यांना वारंवार संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला सहा रेडमेसिवीर इंजेक्शन दिली आणि आज ऑक्सिजन संपल्याचे कारण देत बेड सोडायला सांगितल्याने त्या रुग्णाची गाळण उडाली. अशाच पध्दतीने अन्य रुग्णांनाही पर्यायी व्यवस्था पाहण्याच्या सुचना डॉक्टांनी केल्याने नातेवाईकांची मोठी धावपळ सुरू आहे.

 चिखली स्पाईन रस्त्यावरली गुंजकर हस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने तेथील पेशंटला तत्काळ दुसरीकडे हलविण्याच्या सुचना नातेवाईकांना केल्या आहेत. अशाच पध्दतीने चिंचवड येथील मोरया हॉस्पिटल, आकुर्डी येथील स्टरलिंग हॉस्पिटलमध्ये सुध्दा ऑक्सिजन संपत चालल्याने रुग्णांची परिस्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. महापालिका प्रशासनानेही आता हात टेकले आहेत. पुणे अन्न व पुरवठा विभागाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील बहुसंख्य हॉस्पिटलची अवस्था अत्यंत कठिण झाली आहे.