चिखलीत मुली झाल्याने पतीकडून पत्नीचा छळ

0
481

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – तीनही वेळा मुली झाल्याच्या रागातून पतीने २८ वर्षीय पत्नीला जबर मारहाण करुन शारीरीक आणि मानसिक छळ केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना  तीन वर्षांपासून वेळोवेळी जाधववाडी चिखली येथे घडत होती.

याप्रकरणी पिडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती अनिल रामनयन भारती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला या तीन वर्षांपासून चिखली येथील माहेरी नांदत आहेत. महिलेला तीन मुली आहेत. या कारणावरुन आरोपी पती अनिल हा वारंवार पिडितेला मारहाण करुन तिचा शारीरीक आणि मानसिक छळ करत होता. तसेच जीवे ठारमारण्याची धमकी देखील देत होता. आखेर या त्रासाला कंटाळुन महिलेने चिखली पोलीस ठाणे गाठत पती विरोधात तक्रार दाखल केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.