चिखलीत भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
509

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना चिखली मोशी शिव रोडवर शंकेश्वरच्या साईट समोर घडली.

गणेश बंडोपंत आहेर (वय ३८, रा. आहेरवाडी जाधववाडी, चिखली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ नरेश बंडोपंत आहेर (वय ४७, रा. आहेरवाडी, जाधववाडी चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच/१४/डीएस/३०३१) या क्रमांकाच्या ट्रक वरील चालक बापु दगडु क्षिरसागर (रा. येलवाडी, देहुगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.१७) सायंकाळी चारच्या सुमारास गणेश हे त्यांच्या दुचाकीवरुन चालले होते. ते चिखली मोशी शिव रोडवर शंकेश्वरच्या साईट समोर पोहचले असता (एमएच/१४/डीएस/३०३१) या भरधाव ट्रकवरील चालक बापु याने गणेश याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गणेशचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर अपघातानंतर बापु हा पसार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक घुगे तपास करत आहेत.