“चालकाचे डोळे खाजगी डॉक्टरकडून तपासून घ्या”

0
204

नवी दिल्ली,दि.१९(पीसीबी) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षा महिन्याच्या सुरुवातीला रस्ते सुरक्षा उपायांबद्दल भाष्य केलंय. राजधानी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी आपल्या रस्ते अपघाताबद्दल बोलतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आपल्या गाडीच्या चालकाची डोळे तपासणी खासगी डॉक्टरकडून करून घेण्याचाही सल्ला दिला.

‘महाराष्ट्रात विरोधी नेतेपदी असताना मी माझ्या रेड लाईट कारमधून प्रवास करत होतो. संपूर्ण पोलीस सुरक्षेसहीत माझा ताफा जात होता, तरीही माझा अपघात झाला. नंतर माहीत पडलं की माझ्या चालकाला मोतिबिंदू होता’ असा किस्साही गडकरींनी यावेळी शेअर केला.

दरम्यान आणखी एका मुख्यमंत्र्यांचा चालक तर दोन्ही डोळ्यांनी आंधळा निघाला. एका केंद्रीय मंत्र्याच्या चालकाचाही एक डोळा निकामी झाला होता, असे माहीत पडलेले अनुभवही यावेळी गडकरींनी सांगितले.