चाकणमध्ये विवाहितेचे अपहरण करण्याचा प्रयत्न; आरोपी अटक

0
513

चाकण, दि. ४ (पीसीबी) – विवाहितेचा वारंवार पाठलाग करुन त्रास देत अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.३) रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.

बंडू मारुती पडवळ (वय ३७, रा. शेलु, भैरवनाथ मंदिरासमोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित २३ वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंडू हा २३ वर्षीय विवाहितेचा वारंवार पाठलाग करुन त्रास देत होता. आणि तिच्या पतीच्या मोबाईलवर देखील फोन करायचा. तसेच विवाहिता पायी जात असताना कार आडवी लावून कारमध्ये जबरदस्ती बसवण्याचा प्रयत्न करुन अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावर आरोपी बंडू याला अटक करण्यात आली. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.