चाकणमध्ये भरधाव कंटेनरच्या धडकेत वृध्द दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
481

चाकण, दि. १३ (पीसीबी) – भरधाव कंटेनरच्या धडकेत एका वृध्द दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.६ मे) मे रोजी खेड तालुक्यातील शेलगाव येथे घडली.

काळूराम पंढरीनाथ शिंदे (वय ६५, रा. दावडी, ता. खेड) असे मयत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.६ मे) रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास काळूराम हे त्यांच्या दुचाकीवरून शिक्रापूर ते चाकण या मार्गावरून जात होते. शेलगाव येथील नदीजवळ आले असता भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये काळूराम गंभीर जखमी झाले. आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर कंटेनरचालक कंटेनरसह फरार झाला. चाकण पोलीस आरोपी कंटेनरचालकाचा शोध घेत आहेत.