मंत्रिमंडळात कोणाची वर्णी? मोदी- शहा यांच्यामध्ये पाच तास खलबते

0
420

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रपती भवनात गुरुवारी  भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. त्याआधी नवीन मंत्रिमंडळातील सदस्यांची नाव अंतिम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यामध्ये तब्बल पाच तास मॅरेथॉन चर्चा झाली. अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल,  अशी चर्चा आहे. पण भाजपकडून अजून यासंबंधी काहीही स्पष्ट  केलेले नाही.

अमित शहा मंत्री झाल्यास पक्ष संघटना तितकीत मजूबत राहणार नाही, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. शहा यांचे संघटनात्मक  कौशल्य सर्वांना माहित आहे. पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना बांधून निवडणूक रणनिती आखण्यामध्ये शहा माहीर आहेत. अमित शहा यांना भाजपचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचे श्रेय जाते.

आरोग्याच्या कारणांमुळे अरुण जेटली यांचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नाही अशी चर्चा आहे. विद्यमान सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. अरुण जेटली यांच्या प्रकृतीसंबंधी असलेल्या अफवांवर सरकारचे प्रवक्ते सीतांशू कार यांनी टि्वटरवरुन स्पष्टीकरण दिले. काही प्रसारमाध्यमांमध्ये अरुण जेटली यांच्या प्रकृतीसंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये अजिबात तथ्य नाही असे सीतांशू कार यांनी स्पष्ट केले.