चाकणमध्ये अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

0
416

चाकण, दि. १३ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाणे हद्दीतील नाणेकरवाडी येथे एका खोलीत अडीच वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि.१०) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पिडित चिमुकलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कमल युवराज शेळके आणि शांताराम शेळके (दोघे रा. बाबुराव मोरे यांची रुम, नाणेकरवाडी, चाकण) या दोघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी ३० वर्षीय महिला यांची अडीच वर्षांची मुलगी घराजवळील ओट्यावर खेळत होती. यावेळी आरोपी महिलेने चिमुरडीला ओढीत तिच्या घरात नेले. यादरम्यान घरात आरोपी शांताराम होता. त्याने चिमुरडीचा चावा घेत गुप्तांगाला हातलावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कमल आणि शांताराम या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.