चाकणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मृत्यू

0
550

चाकण, दि. १७ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या जोरदार धडकेत एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना संतोषनगर भाम येथील नाशीक-पुणे महामार्गावर न्यु महादेव हॉटेल समोर घडली.

गंगाराम संताराम काटे (वय २२) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक अजय भापकर यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गंगाराम हा संतोषनगर भाम येथील नाशीक-पुणे महामार्ग ओलांडत होता. यावेळी भरधाव अज्ञात वाहनचालकाने गंगाराम याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गंगाराम याचा मृत्यू झाला. चाकण पोलिस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.