चक्क कंपनीच्या मोकळ्या पेसेजमधून ‘एवढ्या’ लाखोंचा माल चोरीला

0
318

चाकण, दि. ४ (पीसीबी) – कंपनीच्या गोडाऊन समोर ठेवलेला दोन लाख 80 हजारांचा माल चार अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी पहाटे वाघजाईनगर, खराबवाडी येथे टोरंट गॅस पुणे लिमिटेड या कंपनीत घडली.

सुनील मधुकर साखरे (वय 40, रा. खराडी, पुणे. मूळ रा. परभणी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखवळ करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघजाईनगर खराबवाडी येथे टोरंट गॅस लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनीच्या गोडाऊन समोर मोकळ्या पेसेजमध्ये ठेवलेले चार स्टीम बॉल वॉल चार अनोळखी चोरटयांनी चोरून नेले. एका स्टीम बॉल वॉलची किंमत 70 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.