घोरावाडीत रेल्वेची धडक बसून शाळकरी मुलाचा मृत्यू

0
512

घोरावाडी, दि. ३० (पीसीबी) – रेल्वेरुळ ओलांडत असता रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. २९) सकाळी दहाच्या सुमारास घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ घडली.

अजित संजय जाधव (वय १५, रा. शिळीमकर वस्ती, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे मृत्यूमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अजित हा घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळून रेल्वेरुळ ओलांडत होता. यावेळी भरधाव रेल्वेने अजित याला जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तो तळेगाव येथील अॅड.पु.वा.परांजपे विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होता.