घर बंद करून बाहेर जाणे पडले महागात… पहा काय झाले…

0
366

सोमाटणे, दि. ६ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील सोमाटणे गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 63 हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) सकाळी आठ वाजता उघडकीस आली.

महेंद्र मनोहर जाधव (वय 34, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी (दि. 4) रात्री नऊ ते रविवारी (दि. 5) सकाळी आठ वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरटयांनी दरम्यानच्या कालावधीत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून 40 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन हजार रुपयांची नथ आणि 21 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 63 हजारांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत