घराबाहेर पडू नये अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ – मुख्यमंत्री चंद्रशेखर राव

0
619

 

हैदराबाद, दि.२५ (पीसीबी) – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी तेलंगणा सरकारने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा कठोर इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.

लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ. लष्कर बोलावून संचारबंदी लावण्यात येईल, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची चर्चा सुरु आहे.

“राज्यातील नागरिकांनी राज्याबाहेर जाऊ नये. तसेच कुणीही रस्त्यावर उतरु नका. कुणाला काही अडचण असेल तर १०० नंबरवर कॉल करा. पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला मदत करतील. नागरिकांनी राज्य सरकारला सहकार्य करा, असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.