घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना  ७ वर्षांची शिक्षा; १०० कोटींचा दंड

0
684

धुळे, दि. ३१ (पीसीबी) –  जळगांवमधील घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन यांना ७ वर्षांची  तर गुलाबराव देवकर यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  सुरेश जैन यांना १०० कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर गुलाबराव देवकर यांनाही मोठा दंड ठोठावला आहे. धुळे जिल्हा  न्यायालयाने आज (शनिवार) निकाल दिला.

सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. धुळे न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून या घोटाळा प्रकरणी  सुनावणी सुरू  होती.  अखेर या प्रकरणी ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे

चंद्रकांत सोनावणे हे आमदारही या घोटाळ्यात गुंतलेले होते. त्यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून घरकुल घोटाळ्याचा खटला न्यायालयात प्रलंबित होता.  याप्रकरणी आत्तापर्यंत दहा वेळा निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आज अखेर याप्रकरणावर निकाल देऊन एकूण ४८ जणांना दोषी ठरवून त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली आहे.