काळेवाडीत पर्व पर्युषणानिमित्त १०८ दिव्यांची महाआरती

0
819

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – काळेवाडी येथील श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरात पर्व पर्युषणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष कोठारी यांच्या हस्ते १०८ दिव्यांची महाआरती करण्यात आली.

पिंपरी –चिंचवड परिसरात एकमात्र चमत्कारी श्री मुनीसुव्रत स्वामी श्वेतांबर जैन मंदिर आहे. या मंदिरात सर्वात मोठा पर्व पर्युषण चालू आहे. हे पर्व मानवाच्या आत्म कल्याणकारी व विश्वशांतीसाठी संदेश देणार पर्व आहे.

आपल्या जीवनाचे महत्त्व समजले पाहिजे यासाठी वीरसैनिक गुजरातमधून आले आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात भव्य दिव्य रोशनाई करण्यात  आली आहे. ‘तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या’ असा महत्त्वपूर्ण संदेश विश्वशांतीसाठी देण्यात आला आहे.