गो-तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याने पोलीस अधिकाऱ्याची स्वतःविरोधातच तक्रार

0
398

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पोलीस अधिकाऱ्याने स्वतःविरोधातच तक्रार केल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल, पण अशीच एक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःविरोधातच तक्रार दिल्याचा आगळावेगळा प्रकार समोर आला आहे. गो-तस्करी रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याने येथील खारखोडा पोलीस स्थानकात एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वतःविरोधातच तक्रार केली आहे. राजेंद्र त्यागी असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते एसएचओ (SHO) म्हणून खारखोडा पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. पोलीस स्थानकातील जनरल डायरीमध्ये त्यांनी ही तक्रार केली आहे.

खारखोडा पोलीस स्थानकाचा कार्यभार स्वीकारण्याआधी कोणत्याही प्रकरणात जर अधिकारी दोषी आढळला तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असा नियम मी बनवला होता. जर एखाद्या गुन्ह्याविरोधात कारवाई केली नाही तर त्या पोलिसाविरोधात कारवाई केली जाईल असा नियम होता. एखाद्या परिसरात खून, दरोडा अथवा कोणताही गुन्हा घडल्यास त्या परिसराची जबाबदारी असणाऱ्या पोलीस अधिकार्याला त्या गुन्ह्यासाठी जबाबदार धरले जाईल, तसेच दोन वेळेस जर अशी चुकी त्या पोलीस अधिकाऱ्याने केली तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, असा नियम मी बनवला होता, अशी माहिती राजेंद्र त्यागी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. त्यानुसार माझ्या परिसरात गो तस्करीची घटना समोर आली होती, त्यानंतर मी माझ्याविरोधात तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.