गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोणाची लागण!

0
473

मुंबई,दि.२४(पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोरोणा लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ४ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील एका दवाखान्यांमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं.

सध्या जितेंद्र आव्हाड यांना सेल्फ आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आला असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

दरम्यान मुंब्रा-काळवा मधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण झाली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.