राज ठाकरे जर कापूस खरेदी व तूर खरेदी केंद्र सुरू करा म्हणाले असते तर बरं झाले असते – पूजा मोरे

0
399

 

पुणे, दि.२४ (पीसीबी) – राज्याची अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी शासनाने मुंबईतील हॉटेल्स, खानावळ, पोळी-भाजी केंद्र सुरु करावीत जेणेकरून राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तर महसुलात वाढ करण्यासाठी ‘वाईन्स शॉपी’देखील खुल्या कराव्यात, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहित केली आहे. तर याबाबत राज्य सरकारला पत्र देखील लिहिले आहे.

राज ठाकरे यांच्या या मागणीवर आता समाजमाध्यमातून प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, राज ठाकरे जर कापूस खरेदी व तूर खरेदी केंद्र सुरू करा म्हणाले असते तर बरं झालं असत. अशी जबाबदार माणस जर अशी वक्तव्य करायला लागली तर कोराणाने मारणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आणि सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त वाढेल.