गायक रोहित राऊत चे जुईली जोगळेकर बरोबर शुभमंगल…

0
593

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – गेल्या अनेक दिवसांपासून गायक रोहित राऊत आणि त्याची गर्लफ्रेंड जुईली जोगळेकर यांचं ठरले. लग्न नेमकं कधी आहे, याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती. दोघांनी सोशल मीडियावरून लग्नापूर्वीच्या विधींचे काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले होते. परंतु या दोघांचं लग्न नेमकं कधी आणि कुठे होणार याबाबत मात्र त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. अखेर शुक्रवारी रोहित आणि जुईली यांचा साखरपुडा झाला असून येत्या रविवारी म्हणजे २३ जानेवारी रोजी हे दोघं विवाहबद्ध होत आहे. या दोघांचं लग्न पुणे शहरापासून जवळच गिरीवन मधील निसर्गरम्य अशा ढेपे वाड्यात होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर झाले आहेत. त्यानंतर या दोघांवरही चाहत्यांनी आणि त्यांच्या कलाकार मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रोहित आणि जुईल लग्नासाठी प्रसिद्ध असलेल्या ढेपे वाड्यात एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारणार आहेत. ढेपे वाड्यात होणाऱ्या या लग्नसोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि जवळच्या मोजक्या मित्र-मंडळींनाच बोलावण्यात आलं आहे. या दोघांच्या घरी लग्नापूर्वीचे हळद, ग्रहमख, केळवण असे काही विधी झाले असनू दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअ केले आहेत.

सारेगमप लिटिल चॅम्प कार्यक्रमामुळे रोहित राऊत गायक म्हणून ओळखला जाऊ लागला. याच कार्यक्रमात त्याची ओळख जुईली जोगळेकर शी झाली. या दोघांमध्ये सुरुवातीला छान मैत्री होती. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेकदा दोघं कार्यक्रमांत एकत्र दिसायचे त्यामुळे दोघंही रिलेशनमध्ये असल्याचं जाहीर झालं होतं. रोहितने काही दिवसांपूर्वी त्यावर शिक्कामोर्तब केले. सोशल मीडियावर रोहित आणि जुईली खूपच सक्रीय आहेत. एकमेकांसोबतचे कधी मजेशीर तर कधी रोमँटिक फोटो, कधी रिल, व्हिडिओ ते चाहत्यांसाठी शेअर करतात. त्यावर त्यांचे चाहते भरभरून लाइक आणि कमेन्टही करतात. चाहत्यांनी या दोघांच्या जोडीचं ‘rohilee’ असं नामकरणही केलं आहे.