“गळ्यात चैनी घालतात, गॉगल लावतात, पण मास्कसाठी पैसे नसल्याचं सांगतात”

0
227

मुंबई,दि.२८(पीसीबी) – ‘अनेक लोक गळ्यात चैनी घालतात. गॉगल लावतात, पण मास्कसाठी पैसे नसल्याचं सांगतात. ही मानसिकता चुकीची असून मास्क न घालणारे किलर आहेत,’ असं मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

‘मुंबईतील सुमारे दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचं काम करत आहेत. हे अति आत्मविश्वास असलेले लोक आहेत. इतर ९८ टक्के लोकांच्या जिवाला ते धोका निर्माण करत आहेत. मुंबईकर चांगले आहेत. पण काही जणांमध्ये बेफिकरीपणा आहे. ज्यांच्या घरात मृत्यू होतो, त्याला याचा त्रास होतो आहे,’ असं महापौर म्हणाल्या.

‘राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक होत आहे. मुंबईतही काही सवलती दिल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी मुंबईकरांना अधिक सावध राहण्याचं व पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘लोकांनी मास्क लावला नाही तर करोनाला हरवायला खूप वेळ लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.