‘गरवारे निसर्गप्रेमी ग्रुप’ कडून कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

0
790

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – चिंचवड येथील “गरवारे टेक्निकल फायबर” या कंपनीतील “निसर्गप्रेमी ग्रुपकडून” कोल्हापूर जिल्ह्यातील दुन्डगे येथील पूरग्रस्ताना मदत करण्यात आली.

नैसर्गिक आपत्ती कधी सांगून येत नसते..ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूरामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर अस्मानी संकट कोसळले. यात ग्रामीण भागातील जनतेचे सर्व बाजूनी नुकसान झाले. घरातील संसारपयोगी साहित्य वाहून गेले. शिवाय शेती, जनावरांचे ही नुकसान झाले.  आज एक महिना होत आला पण अजूनही ग्रामीण जनजीवन सुरळीत झालेले दिसत नाही. शेतमजूर हातावर पोट असणारी जनता यांच्या हातानाही काम मिळत नाही.  त्यामुळे या लोकांना  मदतीची खरी गरज ओळखून दुन्डगे येथील  २५ ते ३० कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून या मित्रानी गरजू व गरीब कुटुंबांना सणासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये, डाळ, गुळ, तांदूळ,आटा,तेल, सोजी रवा, नारळ,व पूजेचे साहित्य, याचे पॅकिंग करून प्रत्येक कुटुंबांना देण्यात आले.

पुण्याहून, गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपचे शाम कुंभार,  सतीश, माधव, राजेंद्र, संजय, श्रीराम, विलास व रमेश यांनी मदतीचा हात पुढे केला. याप्रसंगी हनिमनाळ गावचे सरपंच राजू चव्हाण, दुन्डगे गावच्या सरपंच रुपाली दावणे व सामाजिक कार्यकर्ते मनोहर दावणे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.