म्हशींची शिंगं चमकवण्यासाठी खर्च केले १६ लाख रुपये

0
409

नवी दिल्ली, दि, ३० (पीसीबी) – चारा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळेस हा घोटाळा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे म्हशींची शिंगं. बिहार सरकारने नुकताच चारा घोटाळ्यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. म्हशींची शिंगं चमकवण्याच्या तत्कालीन सरकारने चक्क १६ लाख रुपये खर्च केल्याचे सरकारने म्हटलं आहे. सन १९९०-९१ ते १९९५-९६ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सरकारने १६ लाख रुपयांचे मोहरीचे तेल खरेदी केल्याची माहिती सरकारने दिली आहे. सध्या चारा घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रीय जनता दलचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव तुरुंगामध्ये असतानाच सरकारने हा खुलासा केला आहे.

बिहारच्या विधानसभेमध्ये बिहार विनियोग प्राधिकरण खर्च विधेयक २०१९ सादर करण्यात आले. हे विधेयक सादर करताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी चारा घोटाळ्यासंदर्भातील हा महत्वाचा खुलासा केला. १९७७-७८ पासून २०१५-१६ पर्यंत करण्यात आलेल्या प्राधिकरण खर्चाचा हिशेब करण्यासाठी आणि खर्च निश्चिती करण्यासाठी हे विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत सादर करण्यात आले. ‘सामान्यपणे एखाद्या योजनेवर जादा खर्च होत असल्यास तो सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मंजूर करुन घेते. मात्र लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हा नियम पाळला नाही. त्यावेळी खोट्या बिलांच्या माध्यमातून पैश्यांवर डल्ला मारण्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे काढण्यात आले,’ असं मोदी यांनी सांगितले.