गणेशोत्सव काळात शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा; मधुकर बच्चे यांची महावितरण प्रशासनाकडे मागणी  

0
616

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरात काल (गुरूवारी) गणपती बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन झाले आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळात महावितरण प्रशासनाने शहरात विद्युत पुरवठा सुरळीत व कायम राहील याची दक्षता घ्यावी व पुढील दहा दिवसांत नागरिकांची कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणीचे निवेदन भाजपचे शहरसचिव आणि महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरण अभियंते शिवाजी वायफळकर यांना दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यभरात गणेशोत्सव मोठा धार्मिक सण म्हणून साजरा होतो. सर्व धर्मीय या सणात मोठा सहभाग घेऊन हा गणेशोत्सव साजरा करत असतात.  विशेषतः गणेशोत्सवात सर्वात मह्त्वाचे काम महावितरण (विद्युत) प्रशासनाचे असते. परंतू, गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवडमधील काही ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा जाणवल्यामुळे गणेशभक्तांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. म्हणून या वर्षी महावितरण प्रशासनाने शहरात विद्युत पुरवठा सुरळीत व कायम राहील याची दक्षता घ्यावी व पुढील दहा दिवसांत नागरिकांची तक्रारच येणार नाही याची काळजी घ्यावी व कदाचित तक्रार आलीस तर त्वरित दखल घेऊन काम करावे, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, भारती विनोदे, सौरभ शिंदे, गणेश बच्चे, सौरभ कर्नावट आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वायफळकर यांनी सांगितले, मी स्वतःहा दहा दिवस लक्ष ठेऊन शहरात  विद्युत पुरवठा बाबत तक्रार येणार नाही याची काळजी घेईन. विद्युत पुरवठा सतत व सुरळीत ठेवण्यावर लक्ष देईल व या दहा दिवसांत सर्व कर्मचारी प्रत्येक पाळीमध्ये जादा वेळ काम करतील व आणखी शक्य तेवढ्या उपाय योजना आजच तयार केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.