गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता – सुधीर मुनगंटीवार

0
613

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गणपती उत्सवानंतर लागू होईल. तसेच १५ ऑक्टोबरच्या  आसपास  मतदान होईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली .  निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असेही  त्यांनी सांगितले.  

भाजपचे निरीक्षक  २८८  जागा  जिंकण्याच्या संभावनांची चाचपणी करत आहेत. कोणती जागा शिवसेनेला देता येईल याचा देखील निरीक्षक अभ्यास करत आहेत. पण युतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शहा घेणार आहेत, त्यामुळे यावर मी भाष्य करणार नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा  १२ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती.  यावेळीही मतदान आणि मतमोजणीची तारीख २०१४ प्रमाणे असण्याची शक्यता आहे.