केमिकल कंपनीत स्फोट; ८ मृत्युमुखी, १० गंभीर

0
589

धुळे, दि. ३१ (पीसीबी)-  शिरपूरजवळील एका केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे.तर जखमींपैकी १० जण गंभीर आहेत. हा स्फोट कशाचा होता, किंवा मृत्यू पावलेले ७ जण कामगार होते की अन्य कुणी याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शिरपूरजवळ वाघाडी गावाजवळ ही केमिकल फॅक्टरी आहे. आज सकाळी या केमिकल कंपनी मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसराला मोठे हादरे बसले. या हादऱ्यांमुळे आसपासच्या घरांनाही तडे गेल्याचे वृत्त आहे. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. तसेच परिसरात धुरांचे लोटही वाढत असल्याचे दिसत आहे.