गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात  पिंपरी- चिंचवडकरांचा लाडक्या बाप्पाला निरोप

0
870

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – पारंपरिक वाद्य ढोल ताशांचा गजर गणेश भक्तांचा सळसळता उत्साह, फुलांची उधळण, लक्षवेधक चित्र रथ, नेत्रदीपक रोषणाई, भगव्या पताका नाचवत, मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…. चा जयघोष व दूतर्फी अबाल वृद्धांची गर्दी आणि वरूनराजच्या साक्षीने पिंपरी-चिंचवड मधील सार्वत्रिक गणेश मंडळांनी भव्य दिव्य मिरवणुकीने लाडक्या बाप्पाला गुरुवारी भावपुर्ण निरोप दिला.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड गावातील चापेकर चौक आणि पिंपरीतील कराची चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात सार्वत्रिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

मिरावणुकी दरम्यान महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका अनुराधा गोरखे, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, भाऊसाहेब भोईर, मिरेश्वर शेंडगे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचेआयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरीतील धोबी घाट आणि चिंचवड थेरगाव रस्त्यावरील पवना नदीच्या घाटावर महापालिकेच्या वतीने विसर्जनाची जय्यत तयारी केली होती. निर्माल्य कुंड, गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी  कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थांनी आणि संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने राबवलेल्या मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. विशेषतः चिंचवड येथे एकाही मंडळाने मिरवणुकीत डीजेचा वापर केला नाही आणि पारंपरिक वाद्यांना पसंती देऊन एक आदर्श निर्माण केला.

मिरावणुकी वेळी पिंपरी-चिंचवड पोलीस दल, पोलीस मित्र संघटना आणि स्वयम सेवी संस्थांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले.

गणेश मंडळ आणि देखावे

१. गजानन मित्रमंडळ, दळवीनगर, चिंचवड

२. पीएनबी हौसिंग, चिंचवड

३. बालतरुण मित्र मंडळ, दळवीनगर

४. मिल्क मेड, परीवार गणेश मंडळ

५. भगतसिंग मित्र मंडळ, चिंचवड गाव, महिलांनी फुलांनी सजवलेली पालकी.

६. गावडे कॉलनी सांस्कृतिक मित्र मंडळ, चिंचवड, फुलांचा आकर्षक चित्र रथ

७. मोरया मित्र मंडळ ट्रस्ट, चिंचवड गाव, भवानी रथ

८. गांधीपेठ मित्र मंडळ, राज गोविंदा रथ, बालाजी मूर्ती

९. काळभैरवनाथ मित्र मंडळ, चिंचवड गाव, शिवाजी महाराज, गज रथ

१०. नवतरुण मित्र मंडळ, भगव्या पताका, शिवरथ

११. मुंजोबा मित्र मंडळ, फुलांनी सजवलेला रथ

१२. सदगुरु गणेश मंडळ, श्रीधर नगर, चिंचवड

१३. चिंचवडचा राजा, गांधी पेठ

१४. श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, गांधी पेठ

१५. श्रीदत्त मित्र मंडळ, चापेकर चौक

१६. उत्कृष्ट तरुण मंडळ, भोई आळी, महापूर देखावा, फुलांची उधळण

१७. नवभारत मित्र मंडळ, फुलांचा जहाज रथ

१८. समर्थ कॉलनी मित्र मंडळ, दळवी नगर

१९. शिवाजी उदय मित्र मंडळ, महिलांचा लक्षणीय सहभाग असलेले ढोल ताशा पथक

२०. समर्थ मित्र मंडळ, तानाजी नगर, मयूर रथ

२१. आदर्श तरुण मंडळ, लोंढे नगर

२२. एम्पायर इस्टेट मित्र मंडळ

२३. मयुरेश्वर मित्र मंडळ, नवसाचा गणपती

२४. गावडे पार्क मित्र मंडळ, भक्ती शक्ती रथ

२५. लक्षमीनगर सार्वजनिक मित्र मंडळ, विठ्ठल मूर्ती

२६. झुंजार युवक मंडळ, तानाजीनागर, मयूर रथ

२७. आनंद नगर मित्र मंडळ, पूरग्रस्तांना मदत

२८.महासाधु मोरया गोसावी

२९. सुदर्शन मित्र मंडळ, चिंचवड, भक्ती रथ

३०. श्री दत्त मित्र मंडळ, मनाचा गणपती

३१. उत्कर्ष मित्र मंडळ

३२. छत्रपती शाहू तरुण मंडळ