खूशखबर; १५३ रुपयांमध्ये १०० टीव्ही चॅनेल मोफत दाखवण्याचे ट्रायचे आदेश

0
2454

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – ग्राहकांचे हित लक्षात घेऊन टीव्हीवरील पसंतीची चॅनेल निवडण्याबाबत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय) ने आज (सोमवार) घेतला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांमध्ये १००  टीव्ही चॅनेल मोफत दाखवण्याचे आदेश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांना दिले आहेत.

ग्राहकांना टीव्हीवरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करण्याची मुभा असेल. १ फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यानुसार  केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांना ग्राहकांना प्रति महिना १५३.४० रुपयांप्रमाणे शंभर चॅनेल फ्री दाखवणे बंधनकारक असेल.  यामध्ये जीएसटीचाही समावेश असेल, असेही ट्रायने स्पष्ट केले आहे.  या १०० चॅनेलमध्ये एचडी चॅनेलचा समावेश  करण्यात आलेला नाही.

तसेच दोन चॅनेलसोबत एक एचडी चॅनेल निवडण्याचा पर्याय ग्राहकांना असेल, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी १९ रुपये मोजण्याचा आणखी एक निर्णय ट्रायने रद्द केला आहे. ग्राहकांना पसंतीची चॅनेल निवड करण्याची मुभा आहे.

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ०११-२३२३७९२२ (ए.के. भारद्वाज) आणि ०११-२३२२०२०९ (अरविंद कुमार) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन  ट्रायने केले आहे. तसेच [email protected] आणि [email protected]. या दोन ईमेल आयडीवर ग्राहकांना काही शंका असल्यास त्या नोंदवता येतील, असेही ट्रायने म्हटले आहे.