खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी वैयक्तीक लाखाची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाच मदत करण्याचे आवाहन

0
388

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – कोरोना विरोधातील लढाईसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी वैयक्तीक एक लाख रुपयांची मदत केली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाच मदत करण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर व देशभर स्थिती अत्यंत चिंतेची बनली आहे. कोवीड-19 मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अशा या संकटाच्या वेळी राज्य सरकारला मोठी मदतीची आवश्यकता आहे. सर्वजण आप-आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करत आहेत.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी वैयक्तीक एक लाखाची मदत केली आहे. कोरोना विरोधातील लढाई मोठी आहे. सर्वांनी शक्यतोपरी राज्य सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे. ज्यांना शक्य असेल. त्यांनी मुख्यमंत्री सहायत्ता निधीलाच मदत करावी असे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

दरम्यान, बारणे यांनी यापुर्वीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 लाख, सांगवीतील औंध ऊरो जिल्हा रुग्णालय आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकरिता वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 50 लाख असा एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याशिवाय खासदार बारणे यांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत गरीब कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. भयावह परिस्थितीमध्ये मदतीचा हात पुढे करत मावळ लोकसभा मतदार संघातील पाच हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप केले आहे.