कोरोनामुळे डाटा ॲनालिसीस क्षेत्रात वाढल्या संधी; आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपोक्षित

0
751

प्रतिनिधी, दि. १४ (पीसीबी) : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळजवळ संपूर्ण जगच लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली. एप्रिल महिन्यामध्ये एकट्या अमेरिकेत ३ कोटी लोकांचा रोजगार गेला. सेंटर फॉर माॅनीटरिंग इकोनाॅमी या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार दि. ३ मे पर्यंत भारतात १२.२ कोटी लोकांना आपल्या रोजगारापासून मुकावे लागले आहे. तज्ञांच्या मते कोरोनाच्या आपत्तीमुळे नजीकच्या काळात जगभरात आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणे अपोक्षित आहे, त्यामुळे आगामी काळात आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर्स, नर्सेस व्यतिरिक्त डाटा ॲनालिस्टची मोठी मागणी जगभरात असणार आहे.

बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिका सहित सर्वच देशांची आरोग्य समस्येसोबत दोन हात करण्याची क्षमता अत्यंत तोकडी असल्याचे आता सिद्ध झाले आहे. डिफेन्स, रोड इन्फ्रास्ट्रक्चर व बिल्डींग कन्सट्रक्शन यासारख्या क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात जगभरातील सर्वच देशांचा कल राहिला आहे. मात्र कोरोना व कोरोना सारखी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यापुढे आरोग्य क्षेत्र विकसित करण्याचा निर्धार अनेक देशांनी बोलून दाखवला आहे. बजेटमध्ये आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात व्यवसायाची संधी असल्याने खाजगी क्षेत्रातील अनेक मातब्बर कंपन्यांनी देखील आपला मोर्चा आता या क्षेत्राकडे वळविला आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांनी आपली अस्तित्वातील क्षमता वाढवायला सुरुवात देखील केली आहे. शेअर बाजारात इतर कंपन्यांचे शेअर गडगडत असताना आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपन्यांचा भाव वधारला आहे. आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणे अपोक्षित असल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, हेल्थ केअर एम्पलाईज व हेल्थकेअर रिलेटेड प्रोफेशनल्स यांच्यासह डाटा ॲनालिस्टस् यांची मोठी मागणी जगभरात असणार आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे.

कॅनडा स्थित इंटरनाॅशनल इंस्टीट्युट ऑफ डाटा सायन्सच्या संचालिका सानिका कामतेकर यांनी आगामी काळात आरोग्य क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या संधीबद्दल माहिती देताना सांगितले की, आरोग्य क्षेत्रात काम करायचे म्हणजे आपण डॉक्टर किंवा नर्स असले पाहिजे असा अनेकांचा गैरसमज आहे. पेशंटवर प्रत्यक्ष उपचार करण्याव्यतिरिक्त मोठी यंत्रणा आरोग्य क्षेत्रात कार्यरत असते. यामध्ये डाटा ॲनालिस्टस् यांना या क्षेत्रात मोठी मागणी आहे व आगामी काळात ही मागणी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. हेल्थकेअर डाटा ॲनालिस्ट, मेडिकल डाटा ॲनालिस्ट, क्लिनीकल डाटा ॲनालिस्ट, लेबाॅरेटरी डाटा ॲनालिस्ट, मेडिकल इक़्विपमेंट डाटा ॲनालिस्ट, बायोटेक डाटा ॲनालिस्ट, बायोइन्फाॅरमॅटीक्स डाटा ॲनालिस्ट, फार्मस्यूटीकल डाटा ॲनालिस्ट, पब्लिक हेल्थ डाटा ॲनालिस्ट व इनफेक्शस / कम्युनिकेबल डीझिसेस डाटा ॲनालिस्ट आदी मनुष्यबळाची हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आवश्यकता आहे. योग्य प्रशिक्षण घेतल्यास सायन्स / कॉमर्स ग्रॅज्यूएट्स, इंजिनियर्स, एमबीए, बी.फार्म आदी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे आरोग्य क्षेत्रात डाटा ॲनालिस्ट म्हणून काम करता येईल अथवा स्वत:ची कन्सलटन्सी सुरु करता येईल, असे सानिका कामतेकर यांनी म्हंटले. तसेच इतर क्षेत्रांच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रात डाटा ॲनालिस्ट्सना चांगला मोबदला सुद्धा मिळतो. भारतातील तरुण तरुणींनी ही संधी वेळीच ओळखून त्या दिशेने प्रयत्न करायला हवे, असेही कामतेकर यांनी म्हंटले.