खंडणी आणि मारहाण प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रमेश नाळे आणि कॉन्स्टेबल राजू केदारीचा जामिन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

0
536

पुणे, दि. ५ (पीसीबी) – मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरून एका तरूणाला अटक करून   बेदम मारहण करत  विजेचा शॉक देऊन त्याच्याकडून साडे आठ लाख रूपये उकळणारा गुन्हे शाखेचा सहायक पोलीस निरीक्षक रमेश नाळे आणि त्याचा सहकारी हेड कॉन्स्टेबल राजू केदारी या दोघांचा जामिन अर्ज आज (बुधवार) पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला.

शनिवार (दि.१ डिसेंबर) या दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

जामिन अर्ज फेटाळताना न्यायालयाने रमेश नाळे आणि राजू केदारी यांच्याकडून खंडणी म्हणून घेतलेले साडे आठ लाख रुपये प्राप्त करणे तसेच मारहाण प्रकरणी अधिक चौकशीसाठी कस्टडीतमध्ये ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोघांवर काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.