क्रिकेटवर बॅटिग घेणाऱ्या पाच जणांना अटक

0
291

पिंपळे सौदागर, दि. २३ (पीसीबी) – क्रिकेटवर बॅटिग घेणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी (दि. 21) रात्री पिंपळे सौदागर येथे ही कारवाई करण्यात आली.

विनोद ऊर्फ बाळू बळीराम अग्रवाल (वय 44, रा. पिंपळे सौदागर) सनी जगदीश मंगलानी (वय 32, रा. पिंपरी), हितेश पुरण लोहाना (वय 30, रा. पिंपरी), सोनू उर्फ रोहित कैलास अग्रवाल (वय 21, रा. पिंपळे सौदागर) आणि शुभम अजय जहागिरदार (वय 28, रा. पिंपळे सौदागर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे कर्मचारी मोहम्मद गौस नदाफ यांनी रविवारी (दि. 22) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे सीम कार्ड खरेदी केले. तसेच भारत सरकारने बंदी घातलेल्या बेटिंगचा व्यवसाय करण्यासाठी काळया पैशाची उलाढाल करत शासनाची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पाच लाख 31 हजार 390 रुपये किमतीच वेगवेगळ्या कंपनीचे 30 मोबाईल फोन 3 लॅपटॉप रोख रक्कम, पैसे मोजायची मशिन, हिशोबाच्या डायऱ्या इत्यादी ऐवज हस्तगत केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.