उघड्या दरवाजातून प्रवेश करत लॅपटॉप पळवला

0
312

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी शास्त्री चौक, भोसरी येथे उघडकीस आली. सत्यम विनोद खंडारे (वय 25, रा. शास्त्री चौक, भोसरी) यांनी रविवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे तीन ते सकाळी सात वाजताच्या दरम्यान फिर्यादी खंडारे यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 15 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.