क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ‘त्या’ 33 बुकींना पोलिसांनी ‘अशा’ ठोकल्या बेड्या

0
349

पुणे, दि.२७ (पीसीबी) : भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या 33 बुकींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गहुंजे क्रिकेट मैदानाच्या जवळील गोदरेज प्रॉपर्टी, घोरडेश्वर डोंगर आणि पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधून सट्टेबाज बुकींना पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या बुकींकडून 45 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये मोबाइल, लॅपटॉप, कॅमरे, दुर्बिणी, विदेशी नोटा जप्त केल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घोरडेश्वराच्या टेकडीवर जाऊन दुर्बिणीतून प्रत्येक चेंडूवर नजर ठेऊन प्रत्येक मिनिटाला बुकी सट्टा लावत होते.

आम्ही 33 बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व बुकी महाराष्ट्रातील तसंच परराज्यातील आहेत. हे आरोपी गहुंजे क्रिकेट मैदानाजवळच रहायला होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.
Ind Vs Eng : सापांनी भरलेल्या जंगलातून वाट तुडवतो, दोन किमी डोंगरावरुन मॅच पाहतो, टीम इंडियाचा वेडा फॅन!

मिळालेल्या माहितीनुसार, घोरडेश्वर टेकडीवरुन आठ बुकींना पोलिसांनी अटक केली आहे. हेच आठ जण दुर्बिणीतून मॅचच्या प्रत्येक बॉलवर नजर ठेून सट्टा लावत होते. वाकड पोलिसांनी 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 8 कॅमेरे, दुर्बिणी, विदेशी नोटा, असा जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही आंतरराज्यीय टोळी असल्याचा अंदाज पिंपरी चिंचवड पोलिसांचा आहे. यामध्ये मध्यप्रदेश येथील 5, हरियाणा येथील 13, महाराष्ट्रातील 11, राजस्थान येथील 2 आणि गोवा, पोर्तुगाल, उत्तर प्रदेश येथील प्रत्येकी एका अटक करण्यात आली आहे.

टीव्हीवर सामन्याचे प्रक्षेपण दोन ते अडीच सेकंड लेट, मग बुकींनी डोंगरच गाठला थेट
टीव्हीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण हे दोन ते अडीच सेकंड लेट होते. त्यामुळे त्यांना सामन्यात काय झाले ते अडीच सेकंद अगोदर समजत असल्याने सट्टा लावणे सोपे पडत होते. त्यामुळे बुकींना अधिकच फायदा होत होता.