धक्कादायक… बालवाडीत गोळीबार, 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू

0
408

थायलंड, दि. ६ (पीसीबी) – थायलंडमध्ये लहान मुलांच्या नर्सरीत अर्थात बालवाडीमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली असून यामध्ये 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानं हा गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, थायलंडच्या ईशान्य प्रातांत ही घटना घडली आहे. लहान मुलांना सांभाळण्यासाठी असलेल्या एका डे केअर सेंटरमध्ये हा गोळीबार झाला असून यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २२ लहान मुलांचाही समावेश आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानं हा गोळीबार केला असून नंतर त्यानं स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये ज्या चिमुकल्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यांचे पालक टाहो फडताना दिसत आहेत. काही लोक हे जखमींना रुग्णवाहिकेतून नेत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पोलीस हल्लेखोराकडे पाहताना दिसत आहेत.

लहान मुलांवर अमानुषपणे गोळीबार करणारा हल्लेखोर हा एक माजी पोलीस अधिकारी आहे. पंतप्रधान जनरल प्रयुत चॅन-ओचा यांनी या नर्सरीत अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याला शोधण्याचे नुकतेच आदेश दिले आहेत.

थायलंडमध्ये सर्वाधिक परवानाधारक
इतर देशांच्या तुलनेत थायलंडमध्ये परवानाधारक बंदुकधारकांची संख्या जास्त असतानाही अशा प्रकारे गोळीबाराच्या घटना खूप कमी वेळा घडल्या आहेत. पण या बेकायदा शत्र वापरणं इथं सर्वसामान्य बाब आहे. यापूर्वी सन 2020 मध्येही असाच गोळीबार झाला होता. यामध्ये संतापलेल्या सैनिकानं अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला होता.