कोरोना संशयित रुग्णाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठीची गरज नाही; आयसीएमआर’चा निर्णय

0
252

पुणे, दि. ४ (पीसीबी) : कोरोना संशयित रुग्णाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) अनिवार्य करण्याची अट आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) शिथिल करण्यात आली आहे. परिषदेने प्रसिद्ध केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘प्रिस्क्रिप्शन नको’, या नव्या नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे.

एखादा विशिष्ट आजार आपल्याला आहे किंवा नाही हे जाणून घेणे हा नागरिकाचा किंवा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्याला चाचणी करायची असल्यास डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट ठेवणे अनावश्यक असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकाला करोना चाचणी करायची असल्यास डॉक्टरांकडे जाऊन चिठ्ठी घेण्याच्या सोपस्कारांतून सुटका झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देशात १,०४९ प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.