केवळ द्वेषापोटी हुकुशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील साहेबांवर निलंबनाची कारवाई केली – रविकांत वरपे

0
202

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील साहेब सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांची मागणी होती की सभागृहात लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी मात्र आज विधानसभेच्या कामकाजात दिशा सालीयानच्या विषयावर बदनामी करू नका अशी तिच्या आई- वडिलांची इच्छा असूनही सत्ताधारी पक्षाचे १४ लोकप्रतिनिधी बोलतात मात्र विरोधी पक्षाच्या एकच लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही. हा विरोधी पक्षावर अन्याय आहे.

सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना देखील विधानसभेत आंदोलन करतात. यासाठी विधानसभेचे कामकाज ५ वेळा तहकूब केले जाते. या सरकारच्या कामकाजा विरोधात जयंत पाटील साहेबांनी आवाज उठवला त्यांनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही. पंरतु केवळ द्वेषापोटी या हुकुमशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील साहेबांवर निलंबनाची कारवाई केली याचा निषेध करतो. मात्र जयंत पाटील साहेबांच्या मागे संपूर्ण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष उभा असून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले.