केदार, नौशादची फटकेबाजी, महाराष्ट्राचा विजय

0
197

बडोदा, दि. 1४ (पीसीबी) : अनुभवी केदार जाधव, नौशाद शेख यांच्या फटकेबाजीने महाराष्ट्राची सईद मुश्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेतील गाडी रुळावर आली. आज झालेल्या सामन्यात त्यांनी छत्तीसगडचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगढने २० षटकांत ५ बाद १९२ धावा केल्या. त्यानंतर महाराष्ट्राने २ बाद १९६ धावा केल्या. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला गुजरातकडून पराभव पत्करावा लागला.

आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरवात तशी निराशाजनक झाली. आक्रमक खेळण्याच्या नादात लागोपाठच्या चेंडूंवर महाराष्ट्राने ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी ही सलामीची जोडी गमावली. त्यानंतर एकत्र आलेल्या केदार जाधव आणि नौशाद शेख यांनी छत्तीसगढच्या गोलंदाजांना निराश केले. केदार जाधवने चौफेर टोलेबाजी करताना महाराष्ट्राचा विजय सुकर केला. या जोडीने १६६ धावांची भागीदारी केली. केदार जाधव ४५ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ८४, तर नौशाद ४४ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांसह ७८ धावा काढून नाबाद राहिला.

त्यापूर्वी, महाराष्ट्राच्या गोलंदाजीतील कमतरता पुन्हा समोर आली. रिषभ तिवारी, शशांक चांदरकर आणि हरप्रीत सिंग भाटिया या आघाडीच्या तीनही फलंदाजांनी चाळीशीत मजल मारली. पण, त्यांना मोठी खेळी करता आली नाही. या तिघांनंतर त्यांच्या फलंदाजाना फारशी मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. त्यातही अखेरच्या टप्प्या शशांक सिंगने ८ चेंडूंत २४ धावांचा तडाखा दिल्यामुळे छत्तीसगढला आव्हानात्मक मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक
छत्तीसगढ २० षटकांत ५ बाद १९२ (रिषभ तिवारी ४४, शशांक चांदरकर ४४, हरप्रीत सिंग ४२, शशांक सिंग नाबाद २४, मनोज इंगळे २-४३) पराभूत वि. महाराष्ट्र २० षटकांत २ बाद १९६ (केदार जाधव नाबाद ८४ (४५), नौशाद शेख नाबाद ७८ (४४),