कुल्फी विक्रेत्याला मारहाण केल्या प्रकरणी नगरसेवक शीतल शिंदे विरोधात गुन्हा

0
556

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – कुल्फीची गाडी लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून नगरसेवक शीतल शिंदे यांनी कुल्फी विक्रेत्याला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. ही घटना शनिवार दि. ८ जून रोजी चिंचवड येथील अहिंसा चौकात घडली.

किशन देवजी गाडरी (वय ३५, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे मारहाण झालेल्या कुल्फी विक्रेत्याचे नाव असून त्याने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, शीतल शिंदे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशन हे कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी कुल्फीची गाडी लावण्याच्या कारणावरुन त्यांचे नगरसेवक शीतल शिंदे यांच्यासोबत भांडण झाले. यातून गाडरी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आला. याप्रकरणी शिंदे विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.