कुदळवाडीत भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक   

0
577

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – कुदळवाडी येथील प्लॅस्टिक साहित्याच्या दुकानाला आज (गुरूवार) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ३ दुकाने जळून खाक झाली. या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीत किती वित्तहानी झाली याची माहिती अदयाप समजलेली नाही.