कासारवाडीत सुरक्षा भिंत कोसळून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
682

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – कासारवाडी येथील जवळकर वस्तीतील यशवंत प्राईड वसाहतीमध्ये सुरक्षा भिंत कोसळून एका ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर त्याची आई जखमी झाली. ही हृद्यद्रावक घटना आज (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास घडली.

लोकेश ठाकूर (वय ६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नांव आहे. तर त्याची आई जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळकर वस्तीमधील यशवंत प्राईड वसाहतीमध्ये ड्रेनेजचे काम सुरू होते. येथे चर काढण्याचे काम सुरू असताना वसाहतीची सुरक्षा भिंत कोसळली. यावेळी भिंतीच्या शेजारी लहान मुले खेळत होती. कोसळलेल्या भिंतीच्या राडारोड्यात लोकेश अडकल्याने त्याचा दु्र्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.