काँग्रेस हा गाढवांचा पक्ष – प्रकाश आंबेडकर

0
589

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिदे यांच्या भेटीवरुन काँग्रेस गाढवपणा करणार हे वाटलेच होते. भेटीचे राजकारण करणे काँग्रेसवाल्यांना चांगलेच जमते, असा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरमधील उमेदवार  प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.   

निवडणुकीत हे लोक कोणाला निवडून देतात. त्यावर अवलंबून असते. पण असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक धडा शिकवतील,  असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि  सुशीलकुमार शिंदे यांची शनिवारी सोलापुरात एका हॉटेलात भेट झाली होती. दोघे कट्टर प्रतिस्पर्धक असून पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान याच भेटीवरुन तर्क वितर्क काढले जात  आहेत. यावरून आंबेडकर यांनी काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे,  असे म्हटले आहे.