नितीन गडकरी मोदींपेक्षा जास्त चांगले पंतप्रधान होऊ शकतात – अनुराग कश्यप

0
540

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – भाजपमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा नितीन गडकरी पंतप्रधान पदासाठी उत्तम पर्याय आहेत. गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा जास्त चांगले पंतप्रधान होऊ शकतात, असे मत बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्वीट करून व्यक्त केले आहे.

सर्वच पक्षांमध्ये भ्रष्टाचार होत असतो. परंतु आता या भ्रष्टाचाराचे स्वरुप बदलले आहे.  भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा मी आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचार संपवणे शक्य नाही, असेही कश्यप यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय सिनेसृष्टीत  मोदी समर्थक आणि  मोदी विरोधक असे दोन गट पडले आहेत. ६०० कलाकारांनी एक पत्रक काढून   मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका, असे आवाहान केले होते. तर  ९०७ कलाकारांनी एकत्र येत  मोदींना पाठिंबा दर्शवला होता.