काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेच्या विचारात कोणती प्रेरणा मिळाली कळत नाही – नितीन गडकरी

0
359

मुंबई,दि.२३(पीसीबी) – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना शिवसेनेच्या विचारांमध्ये कोणती प्रेरणा मिळाली ते समजतच नाही. कुठला विचार कुणाला पटला? हा प्रश्न तर मलाही पडला आहे. मला तर असा कोणताही धागा कुठे दिसला नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा व्हिजन महाराष्ट्राचं या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

या देशात मतभिन्नता हा विषय नाही. मतभिन्नता असली तर हरकत नाही मनभेद असता कामा नये. मतभिन्नतेपेक्षाही घात करते ती विचारशून्यता. माझा विचार आहे, माझी संघटना आहे मी एकवेळ जीव देईन पण नाही जाणार काँग्रेसमध्ये. हा माझा विचार आहे. कारण माझी निष्ठा पक्की आहे,असं गडकरी यावेळी म्हणाले

दरम्यान, राजकारण हे क्रिकेटसारखं असतं कधी कधी चांगला खेळाडू लवकर आऊट होतो आणि नाईट वॉचमन ५० च्या वर धावा करतो. कधी कधी तुम्ही का जिंकलात आणि कधी कधी तुमचा पराभव का झाला याची कारणं देता येत नाहीत. आम्ही राजकारणात आलो ते काही भगवे कपडे घालून प्रवचन द्यायला नाही आलो. सत्तेत जाण्यासाठी आलो. एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीवर प्रेम करतो त्यावेळी असं म्हणतात ना? तो नियम राजकारणातही लागू पडतो,असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.