काँग्रेस आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा; बुधवारी शिवसेनेत प्रवेश

0
463

मुंबई, दि. २० (पीसीबी) – काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे  आज (मंगळवार) दिला.  यामुळे गावीत यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.  

दरम्यान, गावित यांनी  राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.  उद्धव ठाकरे यांनी गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश बुधवारी करू,  असे सांगितल्याचे समजते.   शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे   आज होणारे पक्ष प्रवेश रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, निर्मला गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश बुधवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर होणार आहे. दरम्यान, निर्मला गावित या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर  आमदार म्हणून निवडून आल्या  आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.